मुद्रणासाठी कृष्णधवल धारिका
आलोक ह्या नियतकालिकाच्या संपूर्ण अंकाच्या अथवा सुट्या लेखांच्या पीडीएफ धारिका स्वतःसाठी मुद्रित करून घ्यायच्या असतील तर एक अडचण दिसून येते आहे. धारिकेतील मजकुरामागचा पृष्ठभाग रंगीत आहे (बहुधा दुधी रंगाचा). त्यामुळे मुद्रित करताना त्यासाठीही शाई वापरली जाते. वैयक्तिक वापरातील मुद्रणयंत्र असेल तर त्यासाठी बरीच शाई लागू शकते. त्यामुळे वैयक्तिक मुद्राप्रतींसाठी पृष्ठभागी रंग नसलेली धारिका उपलब्ध करून दिल्यास बरे होईल.