Skip to content

श आणि ल ह्यांची मराठीविशिष्ट वळणे वापरता येण्यासाठी

मराठी ह्या आज्ञासंचात शोभिका हा टंक क्रियापूर्व म्हणून ठेवलेला आहे. पण त्याऐवजी अन्य टंक वापरायचा झाल्यास त्यासाठी टंक ही आज्ञा वापरून टंक बदलता येतो. पण अशा रीतीने टंक बदलला असता त्या देवनागरी टंकांत असलेली श आणि ल ह्यांची मराठीविशिष्ट वळणे दिसत नाहीत. उदा. खालील उदाहरण पाहावे.

\documentclass{article}
\usepackage{marathi}
\टंक{Mukta}

\begin{document}
{%
  \huge
  कुशल%
}
\end{document}

सध्या ती मराठीविशिष्ट वळणे वापरता येण्यासाठी टंक ह्या आज्ञेला चौकटी कंसात [Language=Marathi] हे प्राचल जोडावे लागते. हे प्राचल जोडल्यावर आज्ञालेख खालीलप्रमाणे दिसतो आणि अपेक्षित वळणे मिळवता येतात.

\documentclass{article}
\usepackage{marathi}

\टंक{Mukta}[Language=Marathi]

\begin{document}
{%
  \huge
  कुशल%
}
\end{document}

वस्तुतः मराठी आज्ञासंच वापरल्यावर हे प्राचल जोडण्याची आवश्यकता भासू नये असे वाटते. कृपया हे वैशिष्ट क्रियापूर्वरीत्या आज्ञासंचात येईल असे पाहावे.

Edited by निरंजन